राहुरी/प्रतिनिधी (संदिप आसने) :- जिल्ह्यात ईनिविदा प्रक्रिया,/बी १ निविदा प्रक्रिया सदोष असून भक्कम पुराव्या निशी अनेकदा निवेदने देऊनही वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना पाठिशी घालीत आहे. आंदोलने करूनही कारवाई केली जात नाही. त्यामुये यापुढे राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जिल्हयात येताच घेरावो घालण्याचा इशारा छावा युवक संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष नितीन पटारे यांनी दिला आहे.

पालक मंत्र्यांना पाठिवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महोदय जिल्हा परिषद अहमदनगर यांचे कडील तसेच सर्व पंचायत समिती आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मार्फत राबविल्या जाणाऱ्या ईनिविदा प्रक्रिया/बी १ निविदा प्रक्रिया सदोष असून त्या बाबत वेळोवेळी निवेदन देताना अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे पाटील यांनी पुरावे सादर केले आहेत कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील साहेब यांच्या दि,१७ मार्च २०२० रोजी कडे घंटानाद आंदोलन स्थगित करून चर्चा केली त्यावर एक अक्षरही पत्र कीवा आदेश दिले नाहीत , त्यानंतर वेळोवेळी लॉक डाऊन च्या काळात होणाऱ्या बेकायदेशीर ई_निविदा प्रक्रिया सुरू आहे अशी तक्रार ईमेल/व्हॉटसअप च्या मध्मातून केली परंतु त्याचीही दाखल घेतली गेली नाही

तदनंतर दि.१ जून २०२० रोजी जिल्हा परिषद अहमदनगर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले त्यावेळी उपोषणाच्या निवेदन च्या आधारे आही आजपर्यंत चे झालेले कागदी घोडे नाचवून टाळा टाळी प्रकार एकत्रित करून वेगवेगळी पत्र पाठवून सात दिवसात चौकशी अहवाल पाठविण्याचे आदेश सीईओ अहमदनगर स्वतः शिवराज पाटील यांनी स्वतः च्या सही निशी दिले. परंतु आज त्यागत सर्व आदेश संबधित गटविका अधिकारी पंचायत समिती यांनी थेट केराच्या टोपलीत फिरकवले

आणि आमच्या मागणी नुसार कोणत्याही जाचक अटी ई- निविदा प्रक्रिया राबवताना टाकणार नाही त्यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली परंतु आज ही कोपरगाव तालुक्यात तालुक्यांतीलच मजूर सोसायटी असावी अशी घटनाबाह्य अट शाहजपुर ग्रामपंचायत नें टाकलीय त्याच तालुक्यात इतर ग्रामपंचायतीच्या ईनिविदेत ही अट नाही. तसेच राहुरी तालुक्यातील कोंढवड या ग्रामपंचायत ने तालुक्यातील मजूर सोसायटी अट घातली तेथेही इतर ग्रामपंचातीमार्फत ही अट घातली जात नाही पूर्वी सर्रास ही अट असायची परंतु गटविकास अधिकारी यांच्या शी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर साहेब यांनी चर्चा करून अशी घटनाबाह्य अट शिथील करण्याची तसेच या पंचायत समिती आणि श्रीरामपूर पंचायत समिती ची चौकशी करण्याच पत्र लेखाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांना दिले होते, श्रीरामपूर येथे तर सुशोशित बेरोजगार अभियंता यांना रू ३० लक्ष पर्यंत च्या कामासाठी असलेला शासन अध्यादेहश डावलून ईनिविदा प्रक्रिया सुरू आहे.

तसेच संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायती मार्फत ईनिविदा मध्ये सरपंच सह मीटिंग तसेच स्थळं पाहणी अहवाल अश्या जाचक अटी टाकतात आणि राहता तालुक्यात तर दोन पेज तयार होतील तेवढ्या अटी ईनिविदा प्रक्रिया साठी वापरतात तसेच नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायती मार्फत मनमानी अटी लादल्या जातात त्याच प्रमाणे या ईनिविदा प्रक्रिया पूर्ण पने खाजगी लोकांकडे राबविल्या जातात त्यात अनेक ठिकाणी शासकीय कर्मचारी हा गोरख धंदा करत आहेत उदा संगमनेर तालुक्यातील एक ग्रामसेवक आपल काम सोडून गटविकास अधिकाऱ्यांच्य दालनात कायम बसून ग्रामपंचातीमार्फत रविल्या जाणाऱ्या ईनिविदा स्वतः आपला अधिकार नसताना मनमानी पद्धतीने अटी लाऊन संगनमत करून प्रसिद्ध करून हव्या त्या ठेकेदारास मिळून देतात.

राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायती महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे ई_निविदा प्रसिद्ध करणाऱ्या शासकीय नोकरीत असून तेच खाजगी पण करून मनमानी पद्धतीने अटी टाकून तसेच टेक्निकली घोळ करून मिळून मिसळून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या ठेकेदारास तेही अंदाजपत्रकिय रकमेलाच निविदा मिळून देण्याचे काम करत आहेत आणि विशेष म्हणजे गटविकास अधिकारी याची डिजिटल की हे लोक बेकायदेशररित्या वापरतात तसेच कार्यारंभ आदेश पण हेच तयार करून देतात त्याची फी पण १५००₹ते २५००₹पर्यंत आहे ग्रामसेकांनी आणि गटविकास अधिकारी यांनी फक्त सही करून कमीशन घ्यायचं काम बाकी राहत. आणि पुढील तालुक्यात त कर्जत, जामखेड अकोले, नगर, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव पाथर्डी तर चौकशी केली तर कारवाई कुणावर करावी लागेल याचीच चर्चा सुरू आहे . कारण इथे आजूनही पारंपारिक पद्धतीने १०० रू च्या मुद्रांक वर कामे केली जातात. ही बाब खूप गंभीर बाब आहे

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बी१ निविदा प्रक्रिया अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मनमानी पद्धतीने करतात कोणत्याही साप्ताहिकाचा वापर करून जाहिरात प्रसिद्ध केली जाते ते साप्ताहिक फक्त जाहिराती पुरत प्रसिद्ध होत असत आणि कर न खपणाऱ्या दैनिकात प्रकाशित केली च जाहिरात तर ग्रामसेवक बी१ अर्ज पावती देत नाही. किंवा आमी काम दिलेलं आहे असे सांगून ठेकेदारास थेट पावती मागविणार व्यक्तीस फोन करून बोलून घेऊन धमकविण्याच्र प्रयत्न ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष अखिल भारतीय छावा संघटनेच्या सुशिक्षित बेरोजगारांना च केला या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही खूप तक्रारी केल्या परंतु आपल्या सरकारच्या मंत्री मंडळात असलेल्या मंत्री लोकांचे तालुके त्यांच्या बागलबछंच्याच्या ग्रामपंचायती असले मुळे गटविका अधिकारी सीईओ चे आदेश मानत नाही पण सीईओ आयएएस अधिकारी आहेत ते का टाळाटाळ करताहेत याची चौकशी करावी आणि सीईओ अहमदनगर यांना तसे लेखी आदेश देऊन आपण स्वतः यात लक्ष घालावे. अन्यथा कोविड_१९ च्या प्रदुभवा मुळे राज्य आर्थिक संकटात सापडले असताना होणाऱ्या विकास कामांचा निधी असाच मिळून मिसळून खर्च करण्यात आला तर सामान्य जनता आणेक विकासभिमुख कामापासून वंचित राहणार आहे. आपण दखल घेतली नाही

तर मात्र अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या दालनात नियोजित ठिय्या आंदोलन होणार आहे.
निवेदनावर अखिल भारतीय छावा संघटेचे जिल्हाध्यक्ष, नितीन पटारे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे , राहुरी तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज पाटील, कारेगाव शाखा संघटक अक्षय पटारे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनाश सातपुते पाटील, जिल्हाउपाध्यक्ष अतुल जुंबड पाटील, कर्जत जामखेड जिल्हा संपर्कप्रमुख राहुल सानप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here