अहमदनगर / प्रतिनिधी :- महापालिकेत सेवा देणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोणाची बाधा झाली रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यामुळे छत नसलेल्या टेम्पोत ठेवून रुग्णांला रुग्णालयात नेण्यात आले परंतु खाट शिल्लक नसल्याचे कारण देत रुग्णालयांनी त्याला नकार दिला
दुपारी बारापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णांला दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आटापिटा सुरू होता अखेर सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गुरुवारी कोरोना तपासणी केली
शुक्रवारी रुग्णांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव आला प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी संपर्क केला परंतु ती आली नाही शेवटी नातेवाईकांनी टेम्पोमध्ये रुग्णाला ठेवून रुग्णालयात नेले
प्रथम आनंद लोन येथील मनपाच्या कॉविड सेंटर मध्ये नेण्यात आले तिथे दीड ते दोन तास थांबायला लावल्यानंतर खाट शिल्लक नसल्याचे कारण देत दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले त्यानंतर
टेम्पो न्यूक्लियस रुग्णालयात नेण्यात आला तेथेही काही खाट शिल्लक नसल्याचे कारण दिले गेले त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी नगरसेवक कुमार वाकळे यांच्याशी संपर्क साधून ही परिस्थिती सांगितली वाकडे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधलानंतर तेथून रुग्णाला घेऊन टेम्पो जिल्हा रुग्णालयात पोहोचला तेथेही खाट शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले नातेवाईकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधल्यानंतर रुग्णांला दाखल करून घेण्यात आले मनपाचे कर्मचारी असणाऱ्या रुग्णांला दाखल करण्यासाठी ही कसरत सुरू होती