श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावात सर्व सामान्य व हातावर पोट भरणाऱ्याची संख्या मोठी आहे तरी कोरोना लाँकडाउन मुळे अनेकाचे काम व व्यावसायावर मोठा परिणाम झाला असून कुटुंबाची देखभाल करायची कशी असा प्रश्न सर्व सामान्य समोर उभा ठाकला असुन दत्तनगर गाव वगळता शेजारच्या गावात या योजनेचा लाभ मिळाला असुन दत्तनगर गाव वंचित राहिले आहे सरकारने जरी दर महिन्याला गहू तादुळ देत असले तरी ईतर जीवन आवश्यक वस्तू साठी वणवण करावी लागत आहे आणि व्यावसायिक लोकाकडे स्टाँक कमी असल्याने उधारी देण्यात टाळाटाळ करीत आहे कोरोना प्रादुर्भाव कधी संपतो हा एकच विश्वास घेऊन सर्व सामान्य लोक आपले आजचा दिवस उद्या वर ढकलत आहे तरी दत्तनगर गटातील जि प सदस्य आशाताई दिघे व पंचायत समिती सभापती संगीताताई शिंदे यांनी रोजगार हमी या कामातून सामान्यना रोजगार उपलब्ध होईल का, जसा दुष्काळ काळात ग्रामीण भागात लोकांच्या हाताला रोजगार मीळावा म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा सुरू केली या योजनेत मागेल त्याला किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो घरकुल शौचालय गटारी वैयक्तिक कामाच्या लाभासह शाळेसाठी संरक्षक भिंत ओपन स्पेस डेव्हलपमेंट शेततळे मैदानासाठी साखळी कुपंन काँग्रेट नाला बाधकाम शालेय स्वयंपाक घर सामाजिक वनीकरण वृक्ष लागवड असे एक ना अनेक काम जाँबकाड् तयार असुनही सुलभ कामे उपलब्ध करुन दिली जात नाही यामुळे सर्व सामान्य माणसाला लाँकडाउन काळात रोजगारचा मोठा फटका बसला आहे त्यातून सावरण्यासाठी आशाताई दिघे व संगीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेऊन हक्काचे रोजगार मीळुन दोन पैसे सामान्यना मीळावेत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी व्यक्त केली आहे