राहुरी फॅक्टरी (ऋषि राऊत) : राहुरी तालुक्यातील कणगर येथे मुरूम वाहणाऱ्या ढंपर खाली सापडून आज दिनांक २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ८ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
कनगर येथिल बबन साईराम उर्हे वय वर्ष -३२ हे आज आपला आठ वर्षाचा मुलगा कार्तिक यास सकाळी कनगर गावातून उंबरदरा भागात असलेल्या आपल्या घरी मोटारसायकलवर जात असतांना समोरून कार भागातून मुरूम भरून आलेल्या ढंपर यांच्यात जोराचा अपघात झाला..
यात आठ वर्षीय कार्तिक उर्हे हा जागीच ठार झाला आहे.कार्तिक हा ढंपरच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे.
तर त्याचे वडील बबन उर्हे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे पोलीस फौजफाट्या सह घटनास्थळी दाखल झाले..यावेळी संतप्त जमावाला पांगवून चिमुरड्या
कार्तिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान ढंपर चालक अपघात ठिकाणाहून पसार झाला असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते..
राहुरी तालुक्यात सर्वत्र अवैध मुरूम उत्खनन सुरू असून याकडे महसूल विभाग कानाडोळा करत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी कनगर ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here