श्रीरामपूर- तालुका स्तरावरील व गाव स्तरावरील सरकारी कर्मचारी यांनी मुख्यालई निवासी राहणे करता आदेश करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
अहमदनगर जिल्ह्यतील तालुका व गाव स्थरावरील सरकारी कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मुख्यालई निवासी न थांबता दुसरी कडे निवासा करता राहत आहे,
तसेच बरेच कर्मचारी गावात राहात नसल्याने गावातील रेशन, शिक्षण ,कृषी ,आरोग्य व इतर सुविधा नागरिकांना मिळत नाहीत, कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती अत्यल्प असल्याचे गैरफायदा घेऊन
सरकारी कर्मचारी थोडा वेळ गावात तसेच त्यांचे मुख्यालई थांबतात बाकी वेळ ते कुठे असतात या बाबत कुठलेही माहिती नागरिकांना मिळत नाही, संबंधित अधिकार्यांची चौकशी केली असता कार्यालयातील कर्मचारी हे उद्धट पणाची भाषा वापरून उडवाउडवीची उत्तरे देतात यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे
अधिकारी उपस्थित नसल्यामुळे नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे,
तालुका व गाव स्तरावरील सर्व अधिकारी त्यांचे मुख्यालई निवासी राहावेत असे आदेश महसूल मंत्री यांनी करावे
नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरिता वरील मागणीची दखल घेऊन नागरिकांना न्याय देण्यात यावा , अशा मागण्यांचे निवेदन आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल यांनी महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे