गायत्री कंक्ट्रशन कंपनीच्या मदतीने चांदेकसारे येथे केली रस्त्याची दुरूस्ती !
कोपरगाव/प्रतिनिधी – (मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात उपसरपंचपदी नव्याने नियुक्ती होताच विजय होन यांनी तात्काळ गावातील रस्ते दुरूस्त करण्यावर भर दिला असुन गावातील भैरवनाथ मंदीर ते शिर्डामहामार्ग या साधारण एक किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती समृध्दी महामार्गाचे काम करत असलेल्या गायत्री कंट्रक्शन कंपनीच्या मदतीने करून घेतली. या कामातुन आपण गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी दाखवुन दिले असुन गावाचा विकास हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली आहे . उपसरपंच पदी बिनविरोध निवड झालेले विजय होन यांनी आज ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक तसेच माजीसरपंच केशवराव होन,यांनी चांदेकसारे गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान ते शिर्डी महामार्ग यांना जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था.गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांचा निदर्शनास आणून दिली.
तालुक्याच्या पाश्चिम भागातील नागरीकांना शिर्डी जाण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्याने वहानांची सदैव वर्दळ असते तसेच शेजारीच समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली असुन रस्त्यावर खड्डे पडले होते तसेच रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झुडपांचे साम्राज्य वाढल्याने वाहन चालवताना अडचणी येत होत्या त्यात रस्त्यावरील खडयात पावसाचे पाणी साचल्याने रस्ता खराब झाला होता.उपसरपंच विजय होन व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी गायत्री कंपनीचे अधिकारी यांना रस्त्याची झालेली दुरावस्था निर्दशनास आणुन दिली.व रस्त्याच्या कडेला असनारी काटेरी झुडपे काढुन रस्त्यावर मुरूम टाकुन खड्डे बुजवण्यास सांगितले.गायत्री कंपनीने तात्काळ कामाला सुरूवात केली.
या कामाबद्दल उपसरपंच विजय होन,माजी सरपंच केशवराव होन,सरपंच पुनम खरात व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे चांदेकसारे ग्रामस्थांनी कौतुक केले.