श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यातील न्यायालय कस्टडी मध्ये असणाऱ्या दोन आरोपी काल सायंकाळी पळून गेली त्यातील एक आरोपी पकडण्यास पोलिसांना यश आले असून दुसरा आरोपी फरार आहे

याबाबत माहिती अशी की फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुन्यातील अटक असणाऱ्या आरोपी नामे सचिन नेमाजी काळे रा. मुठेवडगाव व रूपचंद साईराज भोसले रा. निबोडी हे २५/०७/२०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता न्यायालयीन कस्टडी मध्ये असणारे हे आरोपी श्रीरामपूर ते हरेगाव रोड वरील ग्रामीण रुग्णालय याठिकाणी वैद्यकीय तपासणी करून परत येत असताना वाहनाचा वेग कमी असल्याचा फायदा घेऊन वाहनाचा मागील दरवाजा उघडून हातातील बेडी सह फिर्यादी व त्यांचे साथीदार चा नजर चुकून पळून गेले त्यातील एक आरोपी नामे रूपचंद साईराज भोसले उसाच्या शेतामध्ये लपून बसलेला होता त्याला उपविभागीय अधिकारी राहुल मदने तसेच पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे व पोलीस कॉन्स्टेबल लोटके यांनी शिताफीने पकडले असून त्यातील दुसरा आरोपी नामे सचिन नेमाजी काळे रा. मुठेवाडगाव हा फरार आहे त्याचा लवकरात लवकर शोध घेण्याचे काम पोलिस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here