अहमदनगर/प्रतिनिधी :- जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३८२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, अँटीजेन चाचणीत ०५ जण बाधित आढळून आले. तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या २६८ रुग्णांची नोंद एकूण रूग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४५४ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळपर्यंत ६४ जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यात आणखी ४६ कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची भर पडली.

तालुकानिहाय रुग्ण

कर्जत (०४) : राशीन (०३), थेरवाडी (०१).

अहमदनगर (०२) : गुलमोहर रोड (०१), अहमदनगर (०१).

राहाता (०६) : वाकडी (०१), गणेश नगर (०३), साकुरी (०१).

श्रीगोंदा (०३) : बनपिंप्री (०१), काष्टी (०२).

श्रीरामपुर (०६) : वार्ड नं ७ (५), बेलापूर (१)

संगमनेर (१५) : अशोक चौक(०१), पदमानगर (०३), घुलेवाडी (०७), सुकेवाडी (०१), धांदरफळ (०१), उमरी(०१), निमोन(०१).

अकोले (०२) : वारुडी पठार(०१), वाघापूर कोतुळ (०१). नेवासा (०९) : जळका (०१), भेंडा बु.(०१), गळनिंब (०२) करजगाव (०५)

अँटीजेन चाचणीत आज श्रीरामपूर येथील ०५ जण बाधित आढळले. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २६८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा २२४, कर्जत ०३, नगर ग्रामीण ११, नेवासा ०१, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहाता ०६, राहुरी ०५, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०३ आणि श्रीरामपूर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here