कोविड १९ च्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंभर कसली असून,शहरातील कोरोनाचा शिरकाव कमी होता होईना. आजच्या घडीला श्रीरामपुर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ही दिड-शतका पार जाऊन ठेपली आहे. पण नागरिक काही सुधारेना यावर ताळेबंदी हा पर्याय पुन्हा निवडावा लागेल का असा प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य न केल्यास इतर जिल्ह्या किंवा तालुक्या प्रमाणे श्रीरामपुर मध्ये सुद्धा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे कारण गावात कोरोना जलद गतीने वाढताना दिसत आहे. याच गांभीर्य श्रीरामपुर नागरिकांना मुळीच नसेल पण त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही प्रशासन घेतांना दिसत आहे. कोरोनाचे संकट फार मोठे असून श्रीरामपुर मध्ये याचे वास्तव्य झाले आहे. आता नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचा संकल्प करावा. रविवारी श्रीरामपुर शहरात जनता कर्फ्यु असताना टवाळखोर, बिनकामी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.त्यावर आळा बसण्यासाठी प्रशासन कारवाई करत आहे, आणि यापुढे कठोर कारवाई करण्याची गरज आहे. नागरिकांनी सुरक्षित व सतर्क राहावे अशी सूचना प्रशासनाकडून वारंवार होत असताना देखील नागरिक या कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे श्रीरामपुर मध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात कोणाला दोष देऊन चालणार नाही या सर्व घटनेस सर्व दोषी आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण नसलेली नगरपालिका अवघ्या काही दिवसात दीड शतक पार करेल असे वाटले सुद्धा नव्हते. याला नागरिक जबाबदार आहे.यात लग्न समारंभ, जिल्हासोडून प्रवास करणारे नागरिक दोषी असतील. आपल्याला आपले घर,गाव, जिल्हा कोरोनो पासून सुरक्षित ठेवायचा असेल तर फक्त काम असेल तर बाहेर पडावे
विनाकारण गर्दी करू नये, विनाकारण फिरू नये,महत्वाची कामे असतील तरच घराबाहेर पडावे पण तोंडाला मुखपट्टी व सामाजिक अंतर व स्वछतेचे पालन नागरिकांनी करावे. शासनाचे निर्देश आपल्या संरक्षणासाठी आहेत,त्याच प्रमाणे आपण नियम मोडले तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
नियम मोडून नागरिकांची कृत्ये अशीच चालू राहत असेल तर पुन्हा टाळेबंदी करण्यासाठी बेजबाबदार नागरिक याला कारणीभूत ठरतील. त्यात जिल्हाधिकारी यांनी पहिलेच संकेत दिले आहेत. पण अजून पण नागरिकांनी नियमाचे पालन केले तर तशी वेळ श्रीरामपूरकरांना येणार नाही..
घरीच राहा आणि
सुरक्षित राहा