राहुरी/प्रतिनिध(मधुकर वक्ते) :- नगर जिल्यातील अवर्षणग्रस्त सात तालुक्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी तातडीने १७५ कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था केली जाईल.निळवंडे कालव्यांची कामे बंद पडू देणार नाही.येत्या दोन वर्षात कालव्यांची कामे मार्गी लावू व २०२२ साली निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात कालव्यांद्वारे सिंचनाचे पाणी सुरू होईल असे स्पष्ट आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निळवंडे कालवा कृती समितीला नुकतेच राहुरी येथील एका बैठकीत दिले आहे.नगर जिल्ह्यातील राहुरी येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी निळवंडे कालव्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी नुकतीच निळवंडे कालवा कृती समिती समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत मंत्री जयंत पाटील बोलत होते. सदर प्रसंगी कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रसाद तनपुरे,राज्याचे नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक नागेंद्र शिंदे,नाशिकचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी,अधीक्षक अभियंता अलका अहिरराव,निळवंडे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे,अप्पर प्रवरा-२ (निळवंडे) कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीश संघांनी,लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप,निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे,अध्यक्ष रुपेंद्र काले,उपाध्यक्ष सोन्याबापु उर्‍हे,गंगाधर रहाणे,संघटक नानासाहेब गाढवे,ॲड.योगेश खालकर,ज्ञानदेव हारदे आदी प्रमुख मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या वेळी कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे यांनी “निळवंडे कालव्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १९ जानेवारी २०२० रोजी नाशिक विभागीय बैठकीत विविध मंत्री व सचिवांच्या अकराशे कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.परंतु,अर्थसंकल्पात मात्र या बाबतच्या निधीची तरतूद झाली नाही.या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व कालव्यांच्या कामासाठी तातडीची पाचशे कोटी रुपयांची व आगामी अर्थसंकल्पात सहाशे कोटींची तरतूद करण्याची मागणी केली.वर्तमान काळात कालव्यांची कामे ५० टक्के पूर्ण झाली आहेत.परंतु गत वर्षीचा मंजूर निधी संपत आल्याने कालव्यांची कामे कधीही निधीअभावी कामे बंद पडण्याची शक्यता आहे.या खेरीज लाभक्षेत्रातील १८२ गावांच्या पिण्याचे आरक्षण अद्याप पडलेले नाही.त्याबाबत कार्यवाही करावी,काही वर्षांपूर्वी कालव्यांची कामे ठेकेदार न्यू एशियन कन्स्ट्रक्शन कंपनीला दिली आहे.हि कंपनी कालव्यांची कामे अत्यंत धीम्या गतीने कामे करीत आहे.तर काही विशिष्ट ठेकेदारांना कालव्यांची कामे नियमबाह्य दिली असून त्यांची क्षमता नसताना ती दिली गेली आहे.त्यांच्या कामाची मुदत अनेकवेळा संपुनही ती कामे करत नाही.त्यांना जलसंपदा विभाग पाठीशी घालत आहे.त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अथवा ती कामे वेळेत पूर्ण होण्याची शक्यता वाटत नसल्याने या ठेकेदाराकडून हि कामे काढून घ्यावी व त्याच्या फेरनिविदा जाहीर कराव्या अशा मागण्या केल्या.असे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणले.त्यावर मंत्री पाटील यांनी निधीअभावी कामे बंद पडू देणार नाही,ठेकेदारास प्रारंभी नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले व मुदतीत यंत्रणा न वाढविल्यास दंडात्मक कारवाई व त्यावरही त्यांनी दखल न घेतल्यास सदरची कामे काढून घेऊन फेरनिविदा काढण्याचे फर्मान सोडले आहे व हि कामे कोणत्याही परिस्थितीत वेळेत करण्याचे निर्देश उपस्थित गोदावरी खोरे मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक नागेन्द्र शिंदे यांना दिले आहे. व कालव्यांची कामे निर्धारित वेळेतच होतील असे आश्वासन कृती समितीच्या कार्यकर्त्याना दिले आहे.
त्यावेळी चर्चेत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी महत्वाची भूमिका निभावली असून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींनी सहभाग घेतला आहे.उपस्थित जलसंपदा मंत्री,राज्यमंत्री,वरिष्ठ अधिकारी,समितीचे कार्यकर्ते आदी मान्यवरांचे आभार सोन्याबापू उऱ्हे (सर) यांनी मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here