कोपरगाव/ प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील भिमाजी बाजीराव होन यांची नात व गणपत भिमाजी होन यांची मुलगी मोनाली हिचे अल्पशा आजाराने निधन झाले.
मोनाली हिच्यावर साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिला सलग दोन दिवस ताप येत होता. त्यावेळी करोनाची टेस्ट केली असता, तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरानी सांगितले. परंतु ताप कमी अधिक होत असतानी डॉक्टरानी तिची रक्त तपासणी केली असता, तिच्या शरीरातील प्लेट्सलेट्स कमी झाल्यामुळे, रक्त गोठण्याची क्रिया कमी होत असते. त्यामुळे कदाचित तिचे निधन झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चांदेकसारे येथील पानमळा या ठिकाणी राहणारी मोनाली होन हिचे दुःखद निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या १२ वी सायन्सच्या परीक्षेत तिला ७२% मार्क मिळुन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तीला पुढे शिकण्याची इच्छा होती, हुशार व अभ्यासु असून, गणपत रंभाजी औताडे विद्यालयात शिक्षण घेत होती.
या दुःखद निधनामुळे होन परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. होन परिवारात आजोबा भिमाजी बाजीराव होन, वडील गणपत भिमाजी होन, भाऊ ज्ञानदेव भाऊसाहेब होन, कुशाराम गणपत होन, असा परिवार आहे. ह्या कुटूंबाला दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो ! ही मनोकामना