श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- अराजपत्रित पदाची/वर्ग १ ते वर्ग ४ मधील सर्व सरकारी नोकर भरती ही एमपीएससी या घटनात्मक आयोगाकडून घेण्यात यावी या मागणीचे निवेद आम आदमी पार्टीचे चे तिलक डुंगरवाल यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग या घटनात्मक संस्थेच्या माध्यमातून विविध पदांच्या भरत्या या शासन दरबारी दर वर्षी होत असतात,या भरती प्रकियेतून अनेक राजपत्रित पद भरली जातात ज्या मध्ये उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, राज्यउत्पादन शुल्क या सारखे जबाबदार पद या आयोगाने निश्चित केलेल्या परीक्षांच्या माध्यमातून भरले जातात,दर वर्षी हे आयोग अनेक विभागातल्या वेगळ्या रिक्त पदांसाठी परीक्षा घेत असते आणि त्या रिक्त पदी हुशार व कर्तव्यदक्ष अधिकारी नेमत असते,यामुळेच या आयोगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा आदराचा व अपेक्षेचा आहे,
याच बरोबर अराजपत्रित अर्थात वर्ग १ ते वर्ग ४ या गटातील सर्व सरकारी नोकर भरती ही या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून व्हावी या करता आम आदमी पार्टी चे तिलक डुंगरवाल यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली,निवेदनात डुंगरवाल यांनी असे म्हटले आहे की आपण “महापोर्टल बंद” करुन विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली, आता पुन्हा अश्याच कोणत्या खाजगी कंपनी द्वारे चालवल्या जाणाऱ्या नवीन पोर्टल द्वारे ही भरती प्रक्रिया न करता, एमपीएससी द्वारेच ही भरती प्रक्रिया व्हावी अशी रास्त मागणी विद्यार्थी करत आहेत.आपल्या सरकार ने एमपीएससी ला विचारणा केली असता एमपीएससी ने देखील भरती प्रक्रिया घेण्याबाबत तयारी देखील दर्शवलीआहे, आता प्रशासन स्तरावर पुढील निर्णय घेऊन एमपीएससी ला ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांना हिरवा कंदील दाखवने हे आपल्या हातात असल्याचे सांगितले, यावेळी निवेदन देताना
आम आदमी पार्टी चे तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे,राहुल रणपिसे, प्रवीण जमधडे,प्रताप राठोड,किशोर वाडिले राहुल केदार ,श्रीधर कराळे,आदित्य पठारे, दिनेश यादव, यशवंत जेठे, गौतम राऊत, राज मोहम्मद शेख, दीपक परदेशी, सचिन आजगे, आदींचे नावे होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here