श्रीरामपुर (प्रतिनिधी) :- श्रीरामपूर शहर व तालुक्यात १९ जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह तर ४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या १८९ वर जावून पोहोचली आहे

श्रीरामपूरमध्ये आज १९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून. आता श्रीरामपूरचा बधिताची संख्या १८९ वर गेली असून त्यामध्ये सरस्वती कॉलनी (३) दत्तनगर (४) वार्ड नं ४ (२) वडाळा महादेव(२) दळवी वस्ती (२) नॉर्दन ब्रँच (१) बेलापूर (२) पूर्णवाद नगर (१) सरला (२) असून १९ जणांचे सरकारी अहवाल पोजिटीव्ह आला आहे आतापर्यंत श्रीरामपुर येथील संत लूक हॉस्पिटल ला ६० जण उपचार घेत असून आज ६० रेपीड टेस्ट केल्या असुन त्यामध्ये १५ पोजिटीव्ह रिपोर्ट आला असून ४५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्या आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली.

दिवसेंदिवस शहर व तालुक्याची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८९ पर्यंत पोचली आहे तरी देखील श्रीरामपूरच्या प्रत्येक रस्त्यावर ,दुकानासमोर कुठल्याच प्रकारची सोशल डिस्टंसिंग बघायला मिळत नाही. कोरोना ची संख्या झपाट्याने वाढत असून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व आवश्यक कामासाठी बाहेर पडावे आव्हान वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी केले

श्रीरामपूर येथील करोना उपचार केंद्रातून ३० करोना मुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here