कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस कोपरगाव शहरामध्ये शहर शिवसेना व युवा सेना व ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने नागरिकांना मार्क्स वाटून साजरा करण्यात आला.
शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ यांच्या हस्ते नागरिकांना सोशल डिस्टन्स राखत मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख रविंद्र कथले, नगरसेवक अनिल आव्हाड,
उपशहरप्रमुख बालाजी गोर्डे,संतोष जाधव,कुणाल लोणारी,अमोल शेलार,सागर जाधव, संघटक सनी काळे,सागर फडे,वसिम चोपदार,युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव,युवासेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके,युवासेना शहरप्रमुख नितिष बोरुडे
युवासेना उपशहरप्रमुख शिवम नागरे,रुशी धुमाळ,मयुर फुकटे,प्रीतेश जाधव,अभिषेक सारंगधर,विशाल औटी,आशिष निकुंभ ,युवासेना उपतालुकाप्रमुख
विजय गोरडे,अक्षय गुंजाळ,विजय भोकरे,प्रशांत बोरावके,गणेश घुगे अदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना सनी वाघ यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.अनेक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सर्व नियमांचे पालन ते करत आहे.प्रत्येक शिवसैनिक हा त्यांचा आपल्या घरातील सदस्य आहे असे समजूनच ते महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना प्रेम करतात. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. महाराष्ट्रासह देश कोरणा मुक्त व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न आहे असे सांगत महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना शिवसेनेच्या वतीने त्यांनी करून घेतली.
फोटो ओळ…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहर व युवा सेनेच्या वतीने नागरिकांना मास्क वाटप करताना सनी वाघ व इतर सहकारी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here