कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे हातवरचे पोट असणारे फेरीवाले यांचे उद्योग व्यवसाय बंद झाल्या सारखेच आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी उध्दभवलेल्या परिस्थितीचा फेरीवाले यांना हातभार मिळावा म्हणून त्यांना आपला व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी खेळते भांडवलाचा पतपुरवठा बँका मार्फत प्रदान करणेबाबत जाहीर केले आहे.
शहरी फेरीवाला यांना सूक्ष्म-पतपुरवठा करण्यासाठी मार्गदर्शक सुचने प्रमाणे दिनांक २४ मार्च २०२० पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व पात्र लाभार्थींना बँकेमार्फत प्रती लाभार्थी रुपये १००००/- इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फेरीवाले यांना मिळालेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड केल्यास त्यांना ७% दर तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तसेच फेरीवाल्यांनी आपला दैनदिन व्यवहार करतांना ग्राहकांकडून डिजिटल जसे पेमेंट जसे फोन पे/ भारत पे/ पिटीएम/ एमएसविपे/ एफटी कॅश इ. माध्यमाचा वापर केल्यास रु.५०/- ते १००/- याप्रमाणे दरमहा कॅश बॅक मिळेल. केंद्र व राज्य शासन, नगर विकास विभाग यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभाग आणि मार्केट विभाग यांच्या मार्फत शहरातील पथविक्रेते यांचे कायम, हंगामी, व तात्पुरते या गटात बायोमॅट्रिक पद्धतीने सर्वेक्षण दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान करण्यात आले आहे. सदरील सर्वेक्षणामध्ये एकूण १०४६ पथविक्रेते यांची नोंदणी झाली आहे.आज अखेर १०४६ पैकी २०५ फेरीवाले यांनी http://pmsvanidhi.mohua.gov.in या पोर्टलवर स्वतः ॲन्ड्रॉइड मोबाइलद्वारे तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज भरलेले आहे. त्यापैकी ५ फेरीवाल्यांचे प्रस्ताव बँक ऑफ इंडिया, कोपरगाव शाखेने मंजूर केलेले आहे. उर्वरित बँकांनी देखील आपणास प्राप्त प्रस्ताव बैठकीत झालेल्या चर्चे नुसार त्वरित मंजूर करावे. फेरीवालेयांनी प्रथम आपले आपल्या आधारकार्ड सोबत आपला मोबाइल नंबर जोडलेला असल्याची खात्री करावी. किंवा नसल्यास आपल्या आधारकार्ड सोबत मोबाईल जोडणी करून घ्यावा. सदर मोबाईल नंबरच्या आधारे पोर्टलवर लॉगीन करून प्राप्त सूचनांच्या आधारे आपला अर्ज भरत असतांना आधारकार्ड नंबर, फेरीवाला गट निवडीसाठी आपल्या शहरातील सर्वेक्षण यादीनुसार फेरीवाले यांनी आपले अर्ज भरतांना (व्हेंडर कॅटेगरी) बी (B) हा पर्याय निवडावा. व त्यानंतर आपले सविस्तर माहिती जसे की बँक, आयएफएसी कोड, खाते नंबर, दोन परिचित व्यक्तींची नावे मोबाईल नंबर, पत्ता, बँक निवड आदी माहिती अचूक नोंद करावी. जेणे करून भरलेला अर्ज बाद होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.
यासर्व प्रक्रिया दरम्यान फेरीवाले यांना काही अडचण वाटल्यास नगरपरिषदेच्या मार्केट विभाग प्रमुख योगेश्वर खैरे, राजु गाढे, चंद्रकांत साठे किंवा डे-एनयुएलएम विभागाचे शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट, रामनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here