कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी क्रीडा संकुलाचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना घेता यावा यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना क्रिडा संकुल समितीला दिल्या व क्रिडा संकुलात उपलब्ध असलेल्या सुविधा व भविष्यात आवश्यक असणाऱ्या सुविधा यांचा आढावा घेतला. याठिकाणी क्रिडा संकुल असल्याचे सहजासहजी लक्षात येत नाही यासाठी क्रिडा संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे, क्रिडा अधिकारी प्रकाश मोहरे, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, हिरामण गंगूले, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, रमेश गवळी, फकीरमामु कुरेशी, क्रीडा संकुल समितीचे सदस्य बी.सी. वर्पे, आर.बी. पाटणकर, जी.पी. नरोडे आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here