चांदेकसारे – संत तुकाराम महाराजांनी अभंगात सांगीतल्या प्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे,वनचरे याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी मिळेल त्या जागेवर जर आपण वृक्षारोपण केले तर तो पुढील पिढीला ऑक्सिजन निर्माण करून देऊ शकतो. वृक्षरोपण करण्याबरोबरच वृक्षाचे संगोपन करणे हेही तेवढेच बंद बंधनकारक असून केवळ दिखाव्यासाठी खड्डे खोदून त्यात वृक्षरोपण करणे म्हणजे मोठा पुरुषार्थ नाही.लावलेल्या वृक्षाचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. तेव्हा आपल्या कोणत्याही कार्यक्रमात लग्न असो किंवा अंत्यदर्शन सोहळा असो दशक्रियाविधी असो किंवा मुलांचा वाढदिवस असो त्यांच्या नावाने एक तरी वृक्ष आपल्या घरी किंवा शेतात लावावा असे आवाहन चांदेकसारे येथे वृक्षारोपन कार्यक्रमाप्रसंगी केशवराव होन यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे दलीतस्मशान भूमीमध्ये सरपंच पूनम खरात व उपसरपंच विजय होन यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच केशवराव होन,अॕड ज्ञानेश्वर होन,अजित होन,ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर अदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी केले तर आभार सरपंच पुनम खरात यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here