सदर महिलेवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते

श्रीरामपूर :- शहरातील मोरगे वस्ती भागातील एका करोणा ग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सदर ५० वर्षांची महिला आज सकाळी ७ च्या सुमारास लोणी येथील रुग्णालयात उपचार घेत असतांना मयत झाली आहे.

या महिलेला पॅरॅलीसस सदृश आजार होता. कोमात गेल्यावर ती त्यातून बाहेर आली होती व सुधारणा होत असताना अचानक तब्बेत ढासळून दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. सदर मृत महिलेचे अंत्यसंस्कार नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस यांच्या उपस्थितीत करोना प्रोटोकॉल प्रमाणे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here