माळवाडगांव (प्रतिनिधी संदिप आसने) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या यंदाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल आज दि.२९ बुधवार रोजी दुपारी १ वा. जाहिर झाला असून, माळवाडगांव न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.अनुष्का योगेश्वर शिंदे हिने ९०.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे तर मंगेश ज्ञानेश्वर कोरडे ९०.२० टक्के गुण मिळवून व्दितीय, तर अभिजित संदिप आसने व प्रणव मिनानाथ शेपाळ हे समान ८९ टक्के गुण मिळवून तृतीय येण्याचा बहुमान पटकाविला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक गंगाधर नाईक,तंञस्नेही शिक्षक मुकुंद कालंगडे,मनिषा थोरात,मिना गायके,आशिक शेख,निता औताडे,शितल जवादे,सुजित राठोड,स्वाती गायकवाड,तुकाराम चौधरी,अविनाश आसने,दत्ता आदिक,आदींचे मार्गदर्शन लाभले.शाळेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. गुणवत्ता प्राप्त करणार्‍या या विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,प्रसन्ना शेटे,गव्हर्निग कौन्सिल सदस्य हंसराज (नाना) आदिक,माळवाडगांवचे सरपंच बाबासाहेब चिडे,उपसरपंच अलकाताई आसने व सर्व सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here