राहुरी/ प्रतिनिधी :- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखान्याच्या पाठीमागील बाजूने अवैध रीतीने चालू असलेले मुरूम उत्खनन काही राजकीय पुढारी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या बगलबच्चे रोचकपणे उत्खनन करून खुलेआम व्यवसाय करीत आहे असे असताना त्या भागातील तलाठी सर्कल अधिकारी तहसीलदार यांच्या आशीर्वादाने चालू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे गेल्या अनेक दिवसापासून शासनाची रॉयल्टी न भरता व विनापरवाना अवैध रीतीने मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्पन्न चालू असल्याने शासनाला मिळणारे महसूल मिळालेले नाही मुरूम उत्खनन करणारे व शासकीय अधिकारी यांनी संगनमत करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून स्वतःचे खिसे भरण्याचे काम अनेक दिवसांपासून करीत आहे

या अवैध रीतीने चालू असलेल्या उत्पन्नाची तक्रार तहसीलदार राहुरी यांच्याकडे वारंवार करून देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही दिनांक २५/०७/२०२० रोजी अवैध रीतीने मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेने कनगर येथील बारा वर्षाचा चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तसेच मुलाचे वडील देखील या अपघातात गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहे अवैध रीतीने चालू असलेल्या मुरूम उत्खननाचे काम तलाठी सर्कल अधिकारी व तहसिलदार राहुरी यांनी वेळेत थांबवले असते तर आज एका चिमुकल्याचा जीव गेला नसतात या घटनेला जेवढे जबाबदार मुरूम उत्खनन करणारे डंपर चालक-मालक तेवढेच तलाठी सर्कल अधिकारी व तहसिलदार हे देखील जबाबदार आहेत म्हणून या घटनेत दोषी आढळणाऱ्या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व या घटनेची आपण त्वरित दखल घेऊन या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी
आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन येत्या ८ ते १० दिवसांमध्ये संबंधितांवर कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल तरी होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे या निवेदनात नमूद केले असून सदर निवेदन उपविभागीय दंडाधिकारी साहेब अनिल पवार साहेब यांना मनसेच्या वतीने देण्यात आले

याप्रसंगी अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप, राहुरी तालुका अध्यक्ष अनिल डोळस, राहुरी शहराध्यक्ष प्रतिक विधाटे, रस्ते अस्थापणा तालुका अध्यक्ष देवराम शिंदे, राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष अनिल गीते, मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, श्रीरामपूर शहराध्यक्ष सचिन पाळंदे, श्रीरामपूर मनविसे तालुकाध्यक्ष राहुल दातिर शहराध्यक्ष विष्णू अमोलिक,उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष मनविसे विकी राऊत, उपशहरअध्यक्ष राजू शिंदे व मनसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here