श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपूर तालुक्यात कोराने आता कहर केला आहे लोकप्रतिनिधी त्यानंतर माजी नगरसेविका व त्यांचे पती युवानेते आणि आता बंद खोलीतील कैद्या पर्यंत जाऊन पोचला आहे श्रीरामपूर शहरातील हद्दीमधील असलेले दुय्यम कारागृह तेथील असणाऱ्या १५ कैदी व ४ पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल आता समोर आला आहे तसेच राहुरी येथील कैद्यांना कोरोना झालेचे वृत्त हाती आले असुन आरोपी अटक करावे की नाही? त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करावे की नाही? त्यांना पोलिस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी द्यावा की नाही? इतकेच काय या आरोपींच्या जीवितास काही झाल्यास तर याला जबाबदार कोण? आणि याची गार्ड म्हणून सुरक्षा करणाऱ्या पोलिसांचे काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यामुळे सध्या राज्यात ४००० पोलिसांना कोरोणाची बाधा झाली असून ४० जण मयत झाले आहे एकट्या नगर जिल्ह्यात १२ जणांना कोरोणाची लागण झाली आहे आता पोलिसांसह आरोपींचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले असून त्यावर सरकारने तात्काळ उपायोजना करणे गरजेचे आहे

विशेष म्हणजे नगर जिल्ह्याचे गुन्हेचे प्रमाण राज्यात दोन नंबरला आहे त्यामुळे येथील आरोपी देखील कुख्यात आणि हर एक प्रकारचे आहे मात्र पोलिस ठाण्याचा विचार केला तर येथील भौतिक सुविधा आणि पोलिस संरक्षण तसेच पोलीस बळ यात कुठेच ताळमेळ बसत नाही त्यामुळे येथील पोलिस दलाचे गणित नेहमी व्यस्त राहिलेले आहे नगर जिल्ह्याची लोकसंख्या आणि पोलिस बळ आरोपी आणि पोलीस कोठडी तसेच पोलीस कोठडी शेजारी न्यायालयीन कोठडी व त्याची जबाबदारी पोलिसांवर असे अनेक प्रकारे अतिरिक्त काम खात्यावर पडत आहे त्यामुळे अनेकदा निलंबन आणि आता पोलिसांच्या आरोग्यावर प्रहार होताना दिसत आहे खरंतर मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना नाशिक पुणे किंवा नगर येथील सब जेल येथे ठेवणे अपेक्षित आहे मात्र तसे होताना दिसत नाही एकाच १० बाय १० च्या खोल्यांमध्ये २० ते ३० आरोपी ठेवले जातात त्यामुळे आज कोरोनाची जी परिस्थिती आहे ती आरोपींच्या जीवावर बेतली आहे खरंतर सरकारी तिजोरीच्या पैसे नको तिथे खर्च केले जातात मात्र प्रशस्त पोलीस ठाणे आणि खोदऱ्यात पडलेले जेल चे चित्र बदलण्यासाठी कोणतेही सरकार पुढाकार घेताना दिसत नाही आज कोरोनाच्या निमित्ताने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे

१२३ जणांचे घशाचे स्त्राव तपासण्यात आले असून यातील २५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. ९८ अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत २५ कोरोना पोजिटीव्ह अहवालपैकी दुय्यम कारागृह तेथील असणाऱ्या १५ कैदी व ४ पोलिसांना समावेश आहे तर ६ हे श्रीरामपुर तालुक्यातील आहे कोरोना बाधितांचा आकडा २३३ वर गेला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here