कोपरगाव/प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेला तलाठी याने कोपरगाव येथील वाळूच्या पकडलेल्या वाहनावर कारवाई करू नये या साठी कोपरगाव येथील तक्रारदार यांचेकडून पाच हजारांची लाच घेताना आज दुपारी च्या पाहरी त्यांना नगर येथील लाच प्रतिबंधक विभागाने पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले .मात्र अद्याप कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता मात्र या बाबत वरिष्ठ पोलीस अधिकांऱ्यानी या घटनेला दुजोरा दिला आहे.
कोपरगावातील एका वाळूचोराने आपल्या ट्रॅक्टरचा हप्ता वाढीव मागितल्याने वादंग झाल्याने तक्रारदाराने नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालायकडॆ तक्रार दाखल केली होती.त्यातून हा छापा दुपारी दीड वाजेच्या सुमारास टाकला गेला असल्याची माहिती मिळाली आहे.मात्र या बाबत उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवला गेला नव्हता,या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचेशी संपर्क साधला असता असा गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र शिर्डी येथील वरिष्ठ अधिकांऱ्यानी मात्र या छाप्याला दुजोरा दिला आहे.दरम्यान गोदकाठचे चार ते पाच तलाठी हे प्रति महा ट्रॅक्टर दहा ते डंपर पंधरा हजारांचा हप्ता घेत असल्याची माहिती आहे.
कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकांऱ्यानी प्रतिबंध केलेला आहे.व वाळूचे अधिकृत लिलाव झालेले नाही.मात्र तरीही कोपरगाव तालुक्यातून पूर्वमुखी वाहणाऱ्या गोदावरी नदीतून वाळूचोरांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा सुरु आहे.या बाबत वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करत असल्याची विश्वसनिय माहिती आहे.या बाबत अनेकांनी तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.महसूल व पोलीस अधिकारी यांची अभद्र युती आकाराला आल्याने वाळू चोरांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहे.वाळूला नजीकच्या महानगरात प्रचंड मागणी व भाव मिळत असल्याने वाळूचोरांचे व हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे सध्या कोट कल्याण सुरु आहे.त्यासाठी त्यांना संरक्षण मिळण्यासाठी तलाठी,मंडलाधिकारी,वरिष्ठ तालुकास्तरीय महसूल अधिकारी यांना वहानधारकाकडून प्रतिवाहन हप्ता द्यावा लागतो यात मोठा मलिदा मिळत असल्याने अधिकारी हप्ता देणाऱ्या वाहनाकडे दूर्लक्ष करत आहे.कोपरगावातील एका वाळूचोराने आपल्या ट्रॅक्टरचा हप्ता वाढीव मागितल्याने वादंग झाल्याने तक्रारदाराने नगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालायकडॆ तक्रार दाखल केली होती.त्यातून हा छापा दुपारी दीड वाजेच्या सुमारास टाकला गेला असल्याची माहिती मिळाली आहे.मात्र या बाबत उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवला गेला नव्हता,या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचेशी संपर्क साधला असता असा गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे मात्र शिर्डी येथील वरिष्ठ अधिकांऱ्यानी मात्र या छाप्याला दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here