कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे आज दुपारी ३२ वर्षाचा तरुण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला असुन त्याला नगर येथे हलवण्यात आले आहे सदर परिसर तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या सूचनेनुसार सिल केला असून गावचे सरपंच संजय गुरसळ यांच्यासह कोरोना समिती,पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड तसेचआरोग्य विभागाचे कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशकांची फवारणी करण्यात येतआहे.तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सदर घटनास्थळी भेट दिली असुन सर्व ग्रामस्थांनी घरात राहावे घराच्या बाहेर कोणीही फिरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे
यावेळी सरपंच संजय गुरसळ यांनी सांगितले की गावातील व्यक्ती चे आरोग्य तपासणी वेळोवेळी केली जात होती. गावाच्या काळजी पोटी फेरीवाल्यांना गाव बंद केली होती सदर कोरोना बाधीत व्यक्ती ही शिर्डी या ठिकाणी कामाला होती. या व्यक्ती च्या घरच्या लोकांचे स्त्राव तपासणी पाठवले असुन डाऊच खुर्द गावातील काही भाग सिल करण्यात आला असून यामध्ये डाऊच ग्रामस्थांनी मोठी भुमिका घेतली आहे. अशी माहीती डाऊच खुर्द गावचे लोकनियुक सरपंच संजय गुरसळ यांनी दिली असुन.ग्रामस्थांनी घराबाहेर पडू नये आपली व कुटुंबांची काळजी घ्यावी. असे आवाहनही त्यांनी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here