श्रीरामपूर -महाराष्ट्रात महामारी काळात पालकांना दिलासा देण्यासाठी शिक्षण मंत्र्यांनी तातडीने पाऊले उचलून शाळांनी सक्तीची वसुली थांबवण्याचे आदेश करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली, कोविड १९ महामारी दरम्यान राज्यातील उद्योग, व्यापार पूर्णपणे बंद असून यामुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला घर कामगार , वाहन चालक , नोकरदार असे सर्वच नागरिक आर्थिकदृष्ट्या मोठ्या संकटात सापडले आहेत ,दुसरीकडे पाल्यांच्या शाळा बंद आहेत मात्र काही संस्था या ऑनलाइन पद्धतीचा वापर करून पाल्यांना शिक्षणाचे धडे देत आहे, काही शिक्षण संस्था चालक हे फी भरण्यासाठी पालकांवर सक्ती करीत आहे, पालक हतबल होऊन, आपल्या पाल्यांना शाळा सुरु झाल्यावर शिक्षक त्रास देतील या भीतीमुळे हतबल झाल्याने आवाज उठवू शकत नाहीत, परंतु या काळात शासनाने या लाखो पालकांना तातडीचा दिलासा देणे गरजेचे आहे,दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी सरकारने कोरोना काळात खाजगी शाळांना फी वाढू दिलीच नाही उलट त्यांना फी मध्ये सूट देणे भाग पाडले, दिल्लीत सरकारी शाळांचे बारावीचे रिझल्ट खाजगी शाळांपेक्षा उत्तम आले आहेत त्या धर्तीवर महाराष्ट्रात शासनाने पाऊले उचलण्याची गरज आहे, सध्या अहमदनगर जिल्ह्यातील काही शाळा या पालकांवर दबाव टाकून त्यांच्या पाल्याची शैक्षणिक वसूल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत पठाणी पद्धतीने चालवलेली सक्तीची वसुली त्वरित थांबवण्यात यावी व ती वसुली थांबवण्याचे आदेश सर्व संबंधितांना त्वरित देण्यात यावे अशी मागणी आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने शिक्षण अधिकारी सूर्यवंशी यांच्यामार्फत शिक्षण मंत्र्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळीआम आदमी पार्टी
चे तिलक डुंगरवाल ,राहुल रणपिसे ,विकास डेंगळे ,प्रताप राठोड, किशोर वाडीले, गौतम राऊत, दीपक परदेशी ,सचिन आजगे, यशवंत जेटे अभिजित राऊत ,आदित्य पठारे, सुरेंद्र कर्माकर , विकास जगधने, मुस्तफा इनामदार, राजू शेख, अरुण बर्वे व इतर पालक वर्ग सहभागी होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here