श्रीरामपुर तालुक्यातील २३ रुग्ण आज बरे होवून घरी परतले आहेत

श्रीरामपूर :- आज आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ६५ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात १२ जणांचे करोना अहवाल पॉझिटीव्ह तर ५३ जण निगेटीव्ह आले आहेत. यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या २६५ वर जावून पोहोचली आहे. तर २३ रुग्ण आज बरे होवून घरी परतले आहेत.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात मोरगे वस्ती (४), बेलापुर (२), वॉर्ड नं.४ (१), म्हाडा परिसर (३), वॉर्ड नं. ७ (१), लक्ष्मीनारायण नगर (१) रुग्णांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत १०१४ जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २६४ वर जावून पोहोचली आहे. तर ६६८ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

ज्या परिसरात रुग्ण आढळले त्या भागात व परिसरात नगरपालिकेच्यावतीने तत्काळ सॅनिटायर फवारणी तसेच जंतुनाशक फवारणी करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here