श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- श्रीरामपूर येथे भारतीय लहुजी सेनेच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले कष्टकरी समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत संपूर्ण जीवन संघर्षात घालून आपल्या लेखणीने वाणीने समाज जागृती करणारे महानायक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती निमित्त श्रीरामपूर येथील प्रवरा बँक समोरील संपर्क कार्यालयाच्या समोर प्रतिमांचे पूजन करण्यात आले या प्रसंगी भारतीय सेनेचे राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हंटले या कष्टकरी समाजाचे महानायकाच्या जयंतीनिमित्त शासनाचे सुट्टी जाहीर करून कष्टकरी समाजाला मानवंदना द्यावी व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करावी अशी भावना व्यक्त केली या मागणीसाठी शासनाने लक्ष न दिल्यास सातत्याने मागणी करू तसेच राज्यव्यापी आंदोलनाचे करू अशी भावना व्यक्त केली व आलेल्या सर्व पदाधिकारी यांना अण्णाभाऊ साठे जयंती च्या शुभेच्छा व्यक्त केल्या
सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल कायदेशीर सल्लागार ऍड. रमेश कोळेकर जिल्हाध्यक्ष रज्जाकभाई शेख बाळासाहेब त्रिभुवन शेख अहमद नजीर राज्य संपर्कप्रमुख संदीप शेडगे संतोष उमाप रमीज पोपटीया सतीश लोखंडे आशुतोष अभंग कुलकर्णी सर हारूनभाई तांबोळी रईसभाई शेख आदी पदाधिकाऱ्यानी सुरक्षित अंतर ठेवून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन समाजात संसर्गजन्य आजार पसरवणार नाही अशी प्रतिज्ञा घेण्यात आली