श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामपुर तालुक्यातील दत्तनगर गावात १ आँगस्ट २०२० हे वर्षे लोकशाहीर साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांचे जन्म शताब्दी वर्षे असुन या कोरोना महामारी मुळे महाराष्ट्र शासनासह राजकीय सामाजिक संघटना खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्याचा इच्छा असुनही अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याची वेळ या देशावर आलेल्या परिस्थिती पहाता तसेच दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे किरण खंडागळे ग्रामपंचायत सदस्य संजय बोरगे ता.संघटक आर पी आय (आठवले गट) यांच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून फुले आंबेडकर चळवळ खेड्यात पोहचविण्यासाठी सुमारे ५० वर्षे पेक्षा जास्त काळ घातला शाळेत महापुरुषांच्या प्रबोधनकर म्हणून ही शाहीर नरोडे हे सर्वाना परिचित असुन संपूर्ण आयुष्यच शाहीरी मध्ये घालवले आहे म्हणून त्याचं गौरव हा शाल श्रीफळ तसेच नवीन कपडे देऊन एका शाहीराच्या जन्मशताब्दीला दुसऱ्या शाहीराचा सन्मान करून खरं अर्थाने जयंती साजरी झालेल्या सारखे वाटेल आणि अगदी अगळे वेगवेगळ्या प्रकारची सोशल डिस्टन्स पाळुन कुठल्याही नियमांचे उल्लंघन न करता हा साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी सन्मान शाहीराचा उपक्रम राबविण्यात येणार आहे
लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी देखील आपले संपूर्ण आयुष्य कष्टकरी शेतकरी कामगार दलित आदिवासीवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात जनजागृती करून आपल्या शाहीरीनी दमदार आवाजाने स्वातंत्र्य महाराष्ट्र चळवळीत देखील आण्णा भाऊ साठे चळवळ उभी केली होती देशासह साता समुद्र पार आण्णा भाऊ साठे हे पोहोचले होते अशा परिस्थितीत त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने शाहीर नरोडे यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, आर पी आयचे तालुका संघटक संजय बोरगे, ग्रामपंचायत सदस्य सोनाबाई लोंढे, विराट सामाजिक संघटनेचे निलेश सरोदे, लक्षीबाई कांबळे, शेजुळ मास्तर राजु त्रिभुवन, आकाश धीवर, विकी खंडागळे,रोहीत शेजवळ, विश्वास कोळगे, आबा खलाटे, राजु.शेजवळ, नयण शिरसागर, सोनु त्रिभुवन, शेजुळ मावशी आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here