*नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध*

श्रीरामपुर/ प्रतिनिधी :- श्रीरामपूर येथील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणारे लोकमान्य टिळक वाचनालय याठिकाणी आम आदमीचे तिलक डुंगरवाल हे आपल्या कार्यकर्त्यांसह लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात गेले असतात त्याठिकाणी त्यांच्या समोर वेगळे चित्र दिसले आज पुण्यतिथी असून सुद्धा येथील साफसफाई न केल्याचे निदर्शनात आले टिळक वाचनालय येथील लोकमान्य टिळक यांच्या स्मारकावर अंत्यत मोठ्या प्रमाणात धूळ होती,कोणत्याही प्रकारची साफसफाई नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली नव्हती. या वेळी आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण स्मारक व समोरील ओटा स्वच्छ करून लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.परंतु हा सर्व प्रकार निंदनीय आहे याबाबत आम्ही नगरपालिकेला नक्कीच जाब विचारू अश्या भावना तिलक डुंगरवाल यांनी व्यक्त केल्या याप्रसंगी आम आदमी पार्टीचे विकास डेंगळे, प्रवीण जमदाडे ,राहुल रणपिसे ,किशोर वाडीले, अक्षय कुमावत ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here