‘गार्ई’ला दूधाने आंघोळ घालून कारेगावात आगळेवेगळे दूध आंदोलन

ठिकठिकाणी महादेवाला दुग्धाभिषेक


श्रीरामपूर ( प्रतिनिधी संदिप आसने)
दूध दरवाढी’साठी’ व अनुदानासाठी राज्या’सह जिल्हयात भाजप व मित्रपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे जिल्हयातील अन्य मित्रपक्षांच्या वतीने आंदोलन पेटले आहे या दूधवाढी आंदोलनात भाजपचे नेते आक्रमक झाल्याचे पहावयास मिळत आहे
अहमदनगर जिल्ह्यातीलच श्रीरामपूर तालुक्यामधील कारेगावात गार्ईला दुधाने आंघोळ घालून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले आहे.उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात १० रू अनुदान जमा करावेत, दूधाला प्रतिलिटर ३० भाव मिळावा, पावडरला ५० रू अनुदान, आदीसह मागण्यासाठी भाजप व अन्य मित्रपक्षांच्या वतीने दूध वाढीसाठी आंदोलन केले जात आहे

श्रीरामपूर तालुक्यातील येथील कारेगावात गाईला दुधाने आंघोळ घालून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी सभापती दिपक पटारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे कैलास पटारे जालिदर होले महेंद्र पटारे राजेद्र पटारे नवनाथ भवार राजेद्र उंडे सतीश पटारे आदीसह भाजप व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यानी आगळेवेगळे दूध आंदोलन केले. कोण म्हणतो देणार नाहीत…. घेतल्याशिवाय राहणार नाहीत… .दूध उत्पादकाना वाऱ्यावर सोडणाऱ्या निद्रीस्त सरकारचा निषेध असो….. हमीभाव आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा…..!! दूध उत्पादकांवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडीचा सरकारचा धिक्कार असो….!! आदी सह घोषाणांनी परिसर दणाणून गेला होता.

ठिकठिकाणी महादेवाला दुग्धाभिषेक घालण्यात आला होता गोरगरिबाना मोफत दूध वाटप करण्यात आले अहमदनगर जिल्ह्यात दूध आंदोलन पेटले होते.जिल्ह्यासह महाराष्ट्रात दूध दरवाढीसाठी एल्गार भाजपने पुकारला आहे दूध दरवाढीसाठी आज पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव,गळनिंब, टाकळीभान, कारेगाव गोंडेगाव निमगाव खैरी पढेगाव आदी सह गावात उमटले तर कारेगावात येथे भाजपा व कार्यकर्त्याने सकाळीच गाईला दुधाने आंघोळ घालून आगळेवेगळे आंदोलन करून महादेवाला दुग्धाभिषेक करण्यात आला दूध दरवाढीसाठी संताप व्यक्त केला तर ररत्यावर येवून घोषणाबाजी करत आक्रोश व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here