कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते):- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टीचा प्रदेशसचिव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दुध दरवाढ करण्यासंदर्भात आघाडी सरकार विरोधात मतदारसंघातील जेऊर कुंभारी गावातील दुधसंकलन केंद्रावर १ ऑगस्ट रोजी तिव्र आंदोलन करण्यात आले आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना दूध दरवाढीचे केवळ आश्वासन दिले आहे. त्यानंतर शासनाने ठोस असे काहीच शेतकऱ्यांच्या पदरात टाकले नाही. दूधाला योग्य दर मिळावा यासाठी हे आंदोलेन छेडले असल्याचे

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी डायरेक्टर सुभाषराव आव्हाड यांनी सांगीतले आहे. दि १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ते ८ वाजेपर्यंत दुध संकलन केंद्राजवळ निदर्शने केली व घोषणा दिल्या.व सोशल डिस्टंनसींग चे पालन करत हे आंदोलन यशस्वी केले. तसेच माजी संचालक बाळासाहेब चंद्रभान वक्ते यांनी सांगितले की शेतीला जोडधंदा म्हणून दुध व्यवसाय करतात. शासनाने त्यांला योग्य भाव द्यावा शेतक-यांची चष्टा करू नये . उलट शेतक-याला योग्य ती मदत करावी असे सांगितले. यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर सुभाषराव आव्हाड, तसेच संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सभापती शिवाजी वक्ते, उपसरपंच यशवंतराव आव्हाड,विठ्ठलराव आव्हाड, विजयराव रोहम,चांगदेव सर,सतीश आव्हाड,बबलू रोहम,भाऊसाहेब वक्ते,ॠषीकेश आव्हाड,रामचंद्र सानप,नामदेव बिडवे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here