श्रीरामपुर/प्रतिनिधी-(प्रविण जमधडे) :-सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजात सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यात राष्ट्रीय युवा क्रांती सेना नेहमीच अग्रेसर असते.महापुरुषांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वेळी विविध सामाजिक उपक्रम हाती घेत विविध समाजपयोगी तसेच समाजप्रबोधन,होईल अशे कार्यक्रम आयोजित करत असते.
आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राष्ट्रीय युवा क्रांती सेना श्रीरामपूर,यांच्या वतीने लोकमान्य टिळक वाचनालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेतले व लोकशीर अन्नभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.या रक्तदान शिबिरात गणेश म्हस्के,रवी पवार,रवींद्र पवार,विकास म्हस्के सत्यम शिंदे,सुनील सोनवणे यासोबत एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले.हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकास जगधने,अध्यक्ष राजेंद्र बोरकर, उपाध्यक्ष सचिन शेलार यांच्या सह अतुल लोखंडे,अतुल भडकवाड, विशाल औताडे,किरण रंन्नवरे, गणेश पठारे,शंकर रंन्नवरे,आकाश दिवे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.तसेच हे सदर चे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार होण्या साठी जोंधळे ब्लड बँक यांचे आणि त्यांच्या निगडित सर्व लोकांचे सहकार्य लाभले.
युवा सेनेचे सचिव सोहम प्रधान यांनी आलेल्या सर्वच हितचिंतक, रक्तदाते, व सर्वांचे सहकार्य मिळाल्या बद्दल आभार व्यक्त केले व या पुढे ही असेच समाजकार्य करणार असल्याची ग्वाही देखील दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here