रांजणखोल (वार्ताहर) माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील,खा.सुजयदादा विखे पाटील,मुळा-प्रवरा विज संस्थेचे जेष्ठ संचालक अंबादास पाटील ढोकचौळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर-संगमनेर रोङ येथे प्रभात दुध संघाचा दुधाचा टँकर आङवुन राहाता तालुक्यातील रांजणखोल येथील सरपंच चांगदेव अण्णा ढोकचौळे यांच्या उपस्थितीत  दुध उत्पादकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी सरपंच चांगदेव ढोकचौळे म्हणाले की दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे  निद्रिस्त महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे

गेल्या चार महिन्यांपासून  कोविंड१९ या आजारामुळे अत्यंत अडचणीत आलेल्या शेतकरी फक्त दूध व्यवसायावर उपजिवीका साधत आहे परंतु आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दुधाला राज्यांमध्ये 30 ते 32 रुपये पर्यंत भाव मिळत होता आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर या सरकारने जाणून-बुजून शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी केले आणि दूध संघांचे भाव मात्र जैसे थे आहे.

 यांचा निषेध म्हणून आज आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन  करण्याचा निर्णय घेण्यात आला ह्या आंदोलनाचे प्रमुख मागण्या दुधाला 30 रुपये हमीभाव मिळाला पाहिजे ,दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर दहा रुपये अनुदान जमा झालेच पाहिजे ,अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला 50 रुपये अनुदान मिळाले पाहिजे अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे याप्रसंगी रांजणखोल परिसरातील दुध उत्पादक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here