श्रीरामपूर -सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजात सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यात आदमी पार्टी नेहमीच अग्रेसर असते,श्रीरामपूर शराहात गेल्या काळात पार्टी च्या वतीने विविध सामाजिक,धार्मिक शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत,देशाच्या जडणघडणी मध्ये मोलाचे योगदान देणारे देशभक्त महापुरुष यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या विचारांना समाजात जिवंत ठेवण्याचे काम आम आदमी पार्टी चे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने केले जाते,आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच भारतीय स्वातंत्र्य चे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अंत्यत साध्या पध्दतीने सामाजिक अंतर ठेवून घेण्यात आला यावेळी आम आदमी चे तिलक डुंगरवाल यांनी अण्णाभाऊ आणि टिळक यांच्या विचारांना उजळणी देत मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमात या थोर पुरुषांना अभिवादन करत प्रतिमेचे पूजन केले, या प्रसंगी विकास डेंगळे, राहुल रणपिसे, प्रविण जमधडे,किशोर वाडीले, अक्षय कुमावत, विकास जगधने, यशवंत जेठे, नाना बोरकर, दीपक परदेशी,आदी करकर्ते उपस्थित होते.