श्रीरामपूर :- आज आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ५९ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात १६ जणांचे कोरोना सरकारी अहवाल पॉझिटीव्ह तर ४३ जण निगेटीव्ह आले आहेत. तर यामध्ये १ रुग्णांचा अहवाल हा खाजगी प्रयोगशाळा पोजिटीव्ह आला आहे यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या २८२ वर जावून पोहोचली आहे.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात कांदा मार्केट (१), बेलापुर (२), कारेगाव(७), पोलीस कॉलनी (१), मोरगे वस्ती (५), खंडाळा (१) रुग्णांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत १०७३ जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २८२ वर जावून पोहोचली आहे. तर ८७३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here