करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी रविवारी फेसबुक लाईव्हव्दारे नागरिकांशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

अहमदनगर/प्रतिनिधी :- लॉकडाऊनमुळे करोना महामारी थांबत नाही तर संसर्गाचा कालावधी पुढे जातो. ही वैद्यकीय क्षेत्रातील सर्वमान्य बाब आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून चाचव्या करणे व बाधित रूग्णांचे विलीगीकरण करणे हा पर्याय अवलंबला जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली असून आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती केलेली आहे. लॉकडाऊन करण्याचा विषय आता संपलेला असून करोना रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचव्या करून बाधित रूग्णांची विलीगीकरण करणे हाच पर्याय अवलंबण्याची गरज आहे. या काळात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी यांच्या चर्चेतील मुद्दे….

खासगी लॅबमधून पॉझिटिव्ह केसेस जास्त येतात का ?

खासगी लॅबला करोना टेस्टिंग वाढविण्यासाठी समावून घेतले आहे. जिल्ह्यातील शासकीय लॅबमधील टेस्टिंग क्षमता एक हजार आहे, तर रॅपिट अँटीजेन टेस्ट दोन हजारापर्यंत टेस्ट होत आहे. खासगी लॅबमध्येही सरासरी एक हजार टेस्ट होत आहे. या लॅबमध्ये त्रास होणारे लोक जातात. ते घरी जावून स्वॅब घेतात. त्रास होत असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय खासगी लॅबमध्ये टेस्ट करून घेणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खाजगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट जास्त येतात. त्यामुळे याबाबत कोणीही मनात संभ्रम ठेवू नये. जाणूनबुजून कोणी कोणाला पॉझिटिव्ह ठरवत नाही. 

बेड उपलब्धतेसाठी येत्या दोन तीन दिवसात वेबपोर्टल कार्यान्वीत होणार. यावर खासगी तसेच शासकीय कोविड सेंटरमधील उपलब्ध बेडसची माहिती तालुकानिहाय उपलब्ध करून देण्यात येईल.

करोनाबाबत काही लोकांचा दृष्टीकोन गाफीलपणाचा आहे. या महामारीत सावध राहणे काळजी घेणे ही फक्त शासन, प्रशासनाची जबाबदारी नाही. लोकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यायला हवा. स्वयंनिर्बंध व सामूहिक जबाबदारी प्रत्येकाने पाळली पाहिजे.

नगर शहरात अनेक ठिकाणी मास्क परिधान केलेले लोक जास्त दिसले नाही. ही दुर्देवी परिस्थिती आहे. काही लोक खूप गाफील आहेत, त्यांना गांभीर्य समजलेले नाही. लोकांनी स्वत: शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे व बाहेर पडताना मास्क नक्की घालावा.

जिल्ह्यात सध्या करोना संसर्गाचा वेग 17 टक्के आहे. तो दहा टक्क्याच्या खाली आणायचा आहे.

आपल्याला करोनासोबतच जगायचे असून त्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांचे विलीगीकरण करणे हाच उपाय आहे.

प्लाझ्मा थेरपीसाठी करोनामुक्त झालेल्या रूग्णांनी रक्तदान करावे.

शंभर टक्के मास्कचा वापर केला तर एका आठवड्यात बाधितांची संख्या कमी होईल.

खासगी हॉस्पिटलची मदत गरजेची आहे. खासगी हॉस्पिटलमधील उपचारांचे दर शासनाने ठरवून दिले आहेत. खासगी हॉस्पिटलनेही रूग्णांकडून फी घेताना सरकारी नियमानुसारच घ्यावे, दर्शनी भागात रेट कार्ड लावावे. लक्षणे नसलेल्या रूग्णांनी खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये भरती होताना काळजी घ्यावी, तुम्हाला फी द्यावीच लागणार आहे. लक्षणे नसलेल्यांनी कोविड केअर सेंटरमध्ये भरती व्हावे. खासगी हॉस्पिटलने अनावश्यक चार्जेस लावू नका. 

विषाणूची इतरांना संक्रमित करण्याची क्षमता दहा दिवसांची असते. तो एखाद्याच्या शरीरात राहू शकतो, पण इतरांना संक्रमित करू शकत नाही. त्यामुळे करोनामुक्त झालेल्यांकडे चुकीच्या नजरेने पाहू नका. माणुसकीच्या दृष्टीने त्याच्याकडे पहा. करोना कोणालाही होवू शकतो. त्याचा तिरस्कार करण्याची मानसिकता चुकीची आहे. आता लॉकडाऊन पर्याय नाही तर नागरिकांनी स्वतः काळजी घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here