देवळाली प्रवरा प्रतिनिधी (ऋषि राऊत) : टाकळीमिया ता.राहुरी येथे मावशीला भेटण्यासाठी देवळाली प्रवरा येथील अक्षय रविंद्र ढुस वय 23 हा तरुण आपल्या आई समवेत गेला. त्यावेळी विहिरीत पोहणाऱ्या मावस भावांना पाहण्यासाठी गेला असता तोल जाऊन विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने अक्षयचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हि घटना रविवारी दुपारी 1;30 वा. घडली. चार तासाच्या अथक प्रयत्ना नंतर मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की देवळाली प्रवरा येथील रहिवाशी आक्षय रविंद्र ढुस हा आपल्या आई समवेत टाकळीमिया येथील मावशी भानुदास माधव करपे यांच्यांकडे भेटण्यासाठी गेला होता. मावशीच्या दारा समोरील विहिरीत मावस भाऊ पोहत होते त्यांना पाहण्यासाठी विहिरीत डोकावत असताना अचानक तोल जाऊन अक्षय विहिरीत पडला. विहिरीची खोली 40 ते 45 फुट खोल असून विहिरीतील पाण्याच्या पातळी चांगली असल्याने आक्षयचा मृतदेह सापडण्यास अडचणी येत होत्या. देवळाली प्रवरा येथील पट्टीचे पोहणारे विजय पवार,धिरज पवार,तुकाराम पवार, भिवसेन बर्डे आदींनी विहिरीत उड्या घेवून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला परंतू यश आले नाही.देवळाली प्रवरा नगर पालिका व स्थानिक शेतकरी यांचे टँक्टरवरील विज पंपाच्या साह्याने पाणी उपसण्यात येत होते. परंतू विहिरीला पाण्याची आवक चांगली असल्याने पाणी उपसले जात नव्हते.

दरम्यान देवळाली प्रवरा नगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन मधील साहित्य हवेने भरलेल्या ट्युब दोरखंड आदी साहित्यांच्या मदतीने पोहणारे विहिरीत उतरले .विहिरीच्या तळातील गाळात मृतदेह रुतुन बसला होता. चार तासाच्या अथक प्रयत्ना नंतर सायंकाळी 5 वा.मृतदेह काढण्यास यश मिळाले. मृतदेहाचा पंचनामा करुन आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली.मृतदेह बाहेर काढण्यासाठी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे , अमोल कदम ,भारत शेटे, तुषार शेटे, बाळासाहेब खुरुद, सुरेश निमसे,आदीनी मदत केली. घटनास्थळी पो.हे.काँ.संजय पटारे यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह पाठविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here