श्रीरामपूर / प्रतिनिधी :- श्रीरामपूर याठिकाणी कमी कालावधी मध्ये श्रीरामपूर शहराचा विस्तार चारही बाजूस मोठ्या प्रमाणात वाढत आहे व श्रीरामपूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने चारही बाजू लोकांची नेहमीच्या व्यवहारासाठी व्यवसायासाठी ये-जा असल्याने श्रीरामपुर मधील गुन्हेगारी काही गुंड प्रवृत्तीचे लोक या लोकांना लुटून करण्याच्या उद्देशाने दत्तनगर एमआयडीसी परिसर व हरेगाव फाटा गोंधवणी रोड बेलापूर रोड याबाबत विविध स्वरूपात गंभीर घटना घडत होत्या यात बेलापूर रोडला काही घटना घडलेल्यास बेलापूर पोलीस स्टेशन असल्याने नाकाबंदी करून त्वरित आरोपींना पकडण्यात येते परंतु दत्तनगर एमआयडीसीच्या परिसरात मोठे उद्योगधंदे असल्याने या भागात लूटमार खंडणीचे प्रमाण वाढले होते व तसेच हरेगाव फाटा परिसरात देखील रात्री-अपरात्री चोरणाऱ्या लूटमार मोठ्या प्रमाणात होते म्हणून या परिसरातील नागरिक व येणारे-जाणारे भयभीत अवस्थेत होते या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने व गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राहुल मदने साहेब व शहर पोलीस निरीक्षक श्री श्रीहरी बहिरट साहेब व तसेच ग्रामीण पोलीस निरीक्षक मसुद खान साहेब यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जनजागृती करून लोकवर्गणीच्या माध्यमातून या दोन्ही ठिकाणी नव्याने पोलीस चौकीचे उभारणी केली त्याबद्दल या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून व मनसे पदाधिकाऱ्यांकडून पोलीस उपविभागीय अधिकारी श्री राहुल मदने साहेब शहर पोलीस निरीक्षक श्री श्रीहरी बहिरट साहेब व ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री मसूद खान साहेब यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे अभिनंदनाचे पत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले व श्रीरामपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने तीन रस्त्याला पोलीस चौक ची उभारणी केली चौथा महत्त्वाचा रस्ता असलेला गोंधवणी रोड येथे देखील पोलीस चौकी उभारणी करावी यासाठी मनसेच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले

त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की श्रीरामपुर शहरात पोलिसांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे व श्रीरामपूर शहराच्या सुरक्षेचा विचार करून पोलिसांनी नव्याने उभारलेल्या पोलीस चौकीचे काम अतिशय महत्त्वाचे होते व आहेत अशा चांगल्या कामाला सर्वांनी पोलिसांना सहकार्य केले पाहिजे पोलिस नेहमी आपल्या जीव धोक्यात घालून नागरिकांची सुरक्षा करत असतात या करोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र झटून घराकडे दुर्लक्ष करून लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस काम करत होते तेव्हा श्रीरामपूरचे लोकप्रतिनिधी आमदार श्रीरामपूरकरांना वाऱ्यावर सोडून नगर येथील त्यांच्या निवासस्थानी निघून गेले होते व या करणामुळे झालेल्या लोकांमध्ये अनेक तरुण छोटे-मोठे व्यवसाय मजूर बेरोजगार होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली होती अशा परिस्थितीत मनसेचे पदाधिकारी व इतर काही पक्ष सामाजिक संघटनांनी आपल्या ऐपतीप्रमाणे गोरगरीब लोकांना मदत करण्याचे काम केले अशा संकट प्रसंगी

खऱ्या अर्थाने श्रीरामपूर येथील जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आमदाराकडून मदतीची अपेक्षा होती परंतु आमदार लहू कानडे करून कुठलीही मदत झालेली नाही श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टिकोनातून आमदाराकडून विकासाची कामे देखील झालेले नाही जनतेला मदत करण्यास आमदार साफ अपयशी ठरलेले असताना श्रीरामपूर कर यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणून-बुजून जनतेचे रक्षक पोलिस प्रशासन व त्यांच्या कामाला दोष देण्याचे काम करून आमदार स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहे पोलिसांनी लोकवर्गणीतून चांगले काम करून दाखवले

आमदारांनी त्यांच्या विकास निधीतून समस्या अडीअडचणी सोडवून विकासाचे काम करून दाखवावे व तसेच प्रत्येक काम मला विचारूनच केले पाहिजे असे म्हणणे आमदार लहू कानडे यांचे साफ चुकीचा आहे या आमदाराला शहर व ग्रामीण ची पूर्ण माहिती नाही आपण बाहेरील तालुक्याच्या असल्याने या तालुक्यातील मधील गुन्हेगारी समस्या अडीअडचणी समजून घेतले पाहिजेत व आपण स्वकर्तुत्वाने निवडून आलेले नाही दुसऱ्याच्या भावनिक आधारावर निवडून आलेले आहात असेच मी पणा चालू ठेवल्यास श्रीरामपूरतील जनता आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याचे भान आमदार लहू कानडे यांनी ठेवले पाहिजे पहिले कामातून कर्तृत्व सिध्द करावे मग लोक प्रत्येक काम आपल्या कडे घेऊन येतील

लोकप्रतिनिधी म्हणून पाच वर्षांसाठी निवडून आले आहात परंतु पोलीस प्रशासन पोलीस स्टेशन पोलीस चौकी हे जनतेच्या सुरक्षेसाठी कायम राहणार आहे याचे भान आमदाराने ठेवले पाहिजे विनाकारण पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम लहू कानडे करणार असतील तर अशा बिनकामी आमदारांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही व पोलिसांच्या चांगला कार्यास मनसे नेहमी सोबत राहील असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले त्याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जिल्हा तुषार बोबडे जिल्हासचिव डॉ. संजय नवथर उपजिल्हाध्यक्ष सुरेश जगताप तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे शहराध्यक्ष सचिन पाळंदे जिल्हा सरचिटणीस कामगार सेना नंदू गंगावणे शहर सचिव स्वप्नील सोनार तालुका उपाध्यक्ष नवनाथ बोर्डे मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here