श्रीरामपुर (प्रतिनिधी) :-श्रीरामपुर कोरोना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही आहे.रोज नवीन रुग्णाची वाढ होताना दिसत असून श्रीरामपुर तालुक्यात मागील २ दिवसात २९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज पुन्हा ६१ रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ अहवाल हे पॉझिटिव्ह तर ४४ अहवाल हे निगेटिव्ह आले आहे. श्रीरामपुर शहरात ४ रुग्णांचे  अहवाल हे  पॉझिटिव्ह आले असून त्यात म्हाडा परिसर १ रुग्ण, गोंधवणी २, वार्ड नं २ १, असे ४ रुग्ण यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून ग्रामीण भागात १२ रुग्ण आढळून आले आहे त्यात कारेगाव ६, खंडाळा ४, वडाळा १, ,टाकळीभान १ रुग्ण ,ग्रामीण भागात यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तालुक्याची एकूण बाधित रुग्णांची संख्या २९७ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी दिले

नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.नागरिकांनी प्रशासनाचे नियम व अटी पाळून प्रशासनास सहकार्य करावे

आपल गाव सुरक्षित …तर…. आपला परिवार सुरक्षित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here