डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेवर होणार्‍या

श्रीरामपूर /प्रतिनिधी :- गोंधवणी येथील बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेवर होणार्‍या पोलीस चौकीस ग्रामस्थांचा विरोध दर्शविला असून त्याबाबत नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

माजी नगरसेवक के. सी. शेळके यांनी निवेदनात म्हटले आहे की, १९८५ पासून आजपर्यंत त्या जागेवर प्रत्येक वर्षी त्या जागेवर प्रत्येकदिवशी जयंती साजरी केली जाते. त्यानंतर आम्ही १९९० ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रमीण विकास युवा मंच, या नावाने संघटना स्थापन केली. १९९१ ला तत्कालीन एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष गोविंदराव आदिक यांचे हस्ते सदर जागेवर मंडळाच्या पाटीचे अनावरण केले.

त्यावेळेस त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक बांधावे म्हणून त्यासाठी ती जागा मंडळाला दिली आहे. १९८५ पासून ती जागा मंडळाच्या दक्ष सभासदांनी अतिक्रमणापासून वाचवली. मात्र सदर जागेवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस चौकी बांधणार असल्याचे समजते.

याबाबत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची भेट घेतली असता पालिकेने आम्हाला ती जागा दिली आहे आम्ही तेथे पोलिस चौकी बांधणार आहोत, असे सांगितले. त्यानंतर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी स्मारकाच्या जागेवर पोलीस चौकी होऊ नये याबाबतचे निवेदन दिले.

पोलीस चौकी होण्यास आमचा विरोध नाही, परंतु स्मारकाच्या जागेवर पोलीस चौकी होऊ नये ही आमची मागणी आहे. पोलीस चौकीसाठी नगर पालिकेने अन्य जागा उपलब्ध करून द्यावी. ही मंडळाच्यावतीने नगर पालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न नगर पालिकेने करू नये अन्यथा तालुका स्तरावर उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व त्याची जबाबदारी नगरपालिकेची राहील, असा इशारा मंडळाचे सदस्य खुशाबा शेळके, बापू शेळके, के. सी. शेळके, आर. टी. शेळके, सुरेश शेळके, संतोष शेळके, जनार्धन शेळके, बब्रम्हा काळे, विजय शेळके, अमोल शेळके, बाबासाहेब शेळके, संतोष शेळके, बाबासाहेब हरिभाऊ शेळके, अतुल साळवे, दिपक साळवे, अमोल रा. शेळके, रवी शेळके, बाबासाहेब शंकर शेळके, विजय ईश्वर शेळके, पप्पू सायराम शेळके, सुंदर शेळके, बंडू साजन शेळके, उत्तम दगडू शेळके, बाळासाहेब दगडू शेळके यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here