कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- कोपरगांव तालुक्यातील डाउच खुर्द , चांदेकसारे येथील आशुतोष दादा काळे मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. करोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आमदार काळे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत डाउच खुर्द व चांदेकसारे गावातील दादा वर प्रेम करणारे कार्यकर्ते एकत्र येऊन सोशल डिसटंन्सीचा पालन करून वृक्षारोपण करण्यात आले दादा च्या ३५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी ३५ फळा , फुलांची झाडे जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल च्या परीसरात लावली.

या प्रसंगी चांदेकसारे चे सामाजिक कार्यकर्ते किरण अर्जुन होन , रासप चे प्रदेशाध्यक्ष सय्यद बाबा शेख, शरद रावसाहेब होन, डाउच चे मा सरपंच संतोष पवार, या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी भैय्यासाहेब, नुरमोहम्मद शेख, गोकुळ गुरसळ, राजेंद्र होन, डाऊच चे ग्राम पंचायत सदस्य शंकरराव गुरसळ, सतिष होन, पंकज पुंगळ, आर आर पाटील होन, बाळासाहेब होन, सुनिल खरात, स्कूल चे अध्यक्ष भास्करराव होन, संचालक सागर होन, कर्मचारी, बाळासाहेब होन, शरीफ शेख, वाल्मिक होन उपस्थित होते. या प्रसंगी स्कूल च्या वतीने सचिव सुनिल होन यांनी सर्वाचे आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here