कोपरगाव/प्रतिनिधी (मधुकर वक्ते) :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी पुण्यतिथी साजरी करण्यासाठी वाशीम येथे अभिवादन सुरु असताना काही असामाजिक तत्त्वांनी नुकतीच दगडफेक करून व तेथील कार्यकर्ता गणेश गायकवाड यास कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणाचे पडसाद शिर्डी व कोपरगाव तालुक्यात उमटलेले आहे. असे शरद त्रिभुवन यांनी सांगितले या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी व मयताच्या नातेवाईकांना वीस लाखांची भरपाई द्यावी अशी मागणी क्रांतिवीर लहुजी टायगर सेनेच्या वतीने करण्यात आहे. बाबत क्रांतिवीर लहुजी सेनेच्या वतीने शिर्डी येथील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले. गुन्हेगारांवर कारवाई करावी व संबंधित कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना भरपाई पोटी २० लाख रुपये भरपाई मिळावी व त्या कुटुंबातील नातेवाईकांना शासकीय नोकरी मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या.या वेळी शरद त्रिभुवन,मंगेश त्रिभुवन,विजय काकडे,दीपक कांबळे,विनोद वाकळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here