शिवसेना उपनेते, माजी मंत्री व माजी आमदार अनिल राठोड यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी पहाटे 5.30 च्या दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राठोड यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, 3 मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली. अनिल राठोड ‘भैया’ नावाने सर्वत्र प्रसिद्ध होत. भैया हे सलग 5 वेळा नगर शहर मतदार संघाचे आमदार व काही काळ मंत्री देखील होते. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेच्या जडणघडणीत मोठा वाटा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here