श्रीरामपुर/प्रतिनिधी :- काल दिनांक ०५ ऑगस्ट रोजी भारतीयांच्या श्रध्देचा विषय असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्या येथील जन्मस्थळी प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. या आनंदाच्या सोहळ्याचं पुर्ण देशात विविध ठिकानी जल्लोश साजरा करुन स्वागत करण्यात आले. श्रीरामपुर शहरातील विवीध चौकात पेढे तसेच मिठाई वटण्यात आली. प्रभाग १३ मधिल बाजार तळ येथील ओन्ली बजरंग ग्रुप तर्फे या शुभ दिवशी १००१ लाडूंचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने कार्यक्रमात उपस्थीत राहीलेल्या भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष नगरसेवक श्री दिपक बाळासाहेब चव्हाण व भाजपा महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा नगरसेविका सौ वैशाली दिपक चव्हाण यांच्यावर पोलीसांकडून कलम १४४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही हि राजकिय द्वेषातून करण्यात आली असुन यामधे नागरीकांच्या भावना दुःखविल्या गेल्या आहेत.

राम मंदीर हा सर्वांच्या श्रध्देचा विषय असुन या जागतीक संकट काळामध्ये आजच्या कार्यक्रमा मूळे नवचैतन्य पसरले होते. नागरिकांनी स्वखर्चातून लाडू वाटपचा कार्यक्रम ठेवला होता. परंतू फक्त भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असल्या कारणामुळे राजकिय नेत्यांच्या सांगण्यावरुन पोलीसांनी जाणूनबुजून दोन्हीं लोकप्रिय नगरसेवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदर नगरसेवक हे प्रत्येक वेळी नागरिकांच्या प्रश्नासाठी लढत असतात आणि नागरिकांसाठी ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कायम आवाज उठवत असतात. याचं राजकिय द्वेषातून पोलिसांना हाताशी धरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदू धर्माबद्दल असलेला आकास हा नेहमीच अशा कार्यवाही मधुन दिसून येत असतो. दाखल झालेल्या गुन्हा संदर्भात भागतील नागरीक तसेच शहरातली हिंदुत्व वादी संघटनानी निषेध नोंदवला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here