श्रीरामपुर/प्रतिनिधी :- श्रीरामाच्या अश्रूची तपशीला अडभंगनाथ तपोभूमी भामानगर, भामाठाण याठिकाणी काल ५ ऑगस्ट रोजी अडबंगनाथ भक्त परिवाराच्यावतीने मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिर धुऊन सडा रांगोळी आणि गुढी उभारून सायंकाळी पाच वाजेपासून संपूर्ण मंदिरात आणि परिसरात दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहे. आज ६ ऑगस्ट रोजी अडबंगनाथ संस्थान याठिकाणी श्रीरामांची अश्रुची तपशिला असल्यामुळे त्या शिळेला गंगाजल आणि दुग्धाभिषेक करून पूजा करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते अकरा या वेळेत भगवान श्री रामचंद्र जी ज्यावेळेस 14 वर्षांच्या वनवासात होते तेव्हा राम-लक्ष्मण फिरत फिरत याच भूमीत म्हणजे भामानगर, भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या भूमीतून गोदावरीच्या कडेकडेने जात असताना जिथे जिथे श्रीराम थांबले, तिथे तिथे त्या गावाचे नाव पडले .पहिले संवत्सर कोकमठाण दुसरे मातुलठाण तिसरे नागमठाण चौथे बाजाठाण पाचवे ते भामाठाण असा उल्लेख श्री रामायण ग्रंथांमध्ये आहे. भगवान श्री रामचंद्र जी ज्यावेळेस मारीच हरणाच्या मागे आले तेव्हा जिथे श्रीराम घुमले त्या गावाचं नाव घुमनदेव पडले. जिथे कमाल केली हरणाने त्या गावाचे नाव कमलपूर पडले. देव जिथे थांबले ते देवगाव आहे. हरणाचे निवृत्ती अर्थात खूर जिथे गळून पडले ते नेवरगाव झाले. आणि बरगडीला बान लागला ते बगडी कानडगाव झाले . आणि गंगापूर तालुक्यात भगवान श्रीरामांनी हरिण मारलं तेव्हा त्या हरणाचे डोकं जिथे पडलं ते टोक तयार झालं आणि शरीर जिथे पडलं ते कायगाव तयार झालं… अर्थात प्रवरासंगम त्या ठिकाणी आहे. जेव्हा लक्ष्मणाला आवाज आला अरे लक्ष्मणा धाव तेव्हा नाशिक पंचवटीमधून लक्ष्मण इकडे आले आणि रामजी जवळ आले. राम आणि लक्ष्मण यांची जिथे भेट झाली तेच भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर… याठिकाणी लक्ष्मणाला श्रीरामांनी बघितल्यानंतर रामाच्या मुखातून शब्द निघाले आणि लक्ष्मण सीतेला सोडून का आलास सीतेच्या विरहामुळे भगवान श्रीराम लक्ष्मणाच्या गळ्यात पडून रडू लागले, तेव्हा रामाचे अश्रू धरणीवर पडले आणि धरणीमाते ने ते अश्रूं तिथे तपशिला तयार झाली. ते स्वयंभू आहे. अशा पवित्र श्रीरामाच्या तपशिले वरती अडबंगनाथ यांनी बारा वर्षे तप केले. आणि तेच अडबंगनाथ चिरंजीव झाले. तीच अडबंगनाथ तपोभूमी आहे भामानगर भामाठाण तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र, या पवित्र ठिकाणी…इथे सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये सद्गुरू नारायणगिरी महाराज यांनी त्या ठिकाणचा कायापालट करण्याची आज्ञा स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांना दिली. आणि आज संपूर्ण राज्य आणि देशाचं श्रद्धास्थान अडबंगनाथ संस्थान भामानगर भामाठाण झालेल आहे. अशा पवित्र ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान, श्रमदान अधिकच अनन्य साधारण महत्त्व आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here