श्रीरामपुर/प्रतिनिधी :- अयोध्या मध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे विहार बांधावे या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले
याबाबत सविस्तर माहिती असे की दिनांक ५/८/२०२० रोजी सर्व हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू रामचंद्र यांचे मंदिर बांधण्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोध्या मध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात देशाचे सन्मानीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला होता या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद झाला असून अभिमान वाटत आहे अनेक वर्षापासून जागेचा प्रलंबित प्रश्न त्याबद्दल समाधान व्यक्त करतो माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकालांमध्ये मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेले मज्जितला सुद्धा पर्यायी जागा दिली त्याबद्दल आनंद होत आहे त्यामुळे किती वर्षापासून वाद असलेले लोणी प्रश्न मार्गे लागल्यामुळे हिंदू व मुस्लिम बांधवांना मध्ये आनंदाचे वातावरण आहे

तसेच आयोध्या मध्ये काही खोदकाम झाले त्यावेळी भगवान गौतम बुद्धाचे पुरातन काळाचे काही अवशेष सापडले आहे त्यामुळे या भूमीमध्ये भगवान गौतम बुद्ध यांचे वास्तव्य होते यावरून सिद्ध होते त्यामुळे आयोध्या मध्ये भगवान बुद्धाचे विहार बांधणे कामे लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे यांनी दिली अशा आशयाचे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी अनिल पवार साहेब यांना देण्यात आले यावेळी रॉकि लोंढे, महेंद्र त्रिभुवन, राजू नाना गायकवाड, संतोष शेळके, संजय बोरगे, अशोक लोंढे, संदीप पवार, किरण खंडागळे, उमेश जावळे, प्रवीण अहिरे, राजू सुतार, रवी कापसे, आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here