आज करण्यात आलेल्या १०९ रेपीड टेस्ट मध्ये सबजेल मधील १७ कैद्यांना कोरोना ची बाधा झाली आहे

श्रीरामपूर :- आज करण्यात आलेल्या १०९ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात २८ जणांचे कोरोना सरकारी अहवाल पॉझिटीव्ह तर ८१ जण निगेटीव्ह आले यामुळे तालुक्यात आता एकूण रुग्ण संख्या ३५९ वर जावून पोहोचली आहे.

संतलूक हॉस्पिटलमध्ये ४८ जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरु आहेत.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णात वार्ड नं ६ (२), वार्ड नं ३ (१), खंडाळा (२), नेवासा रोड (२), पढेगाव (१), सबजेल (१७) बेलापूर (३) रुग्णांचा समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत १९९० जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३५९ वर जावून पोहोचली आहे. तर ९१६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here