जेऊर कुंभारी/प्रतिनिधी(मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाषराव आव्हाड,न्यु इन्शुरन्स मॅनेजर भिमराज वक्ते, संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सभापती शिवाजी वक्ते, यांच्या हस्ते करण्यात आले . शासनाच्या सोशल डिस्टिंग चे व शासनाच्या नियमांचे पालन करूण सदर परिसरात प्रतिमा पुजन करण्यात आले.

यावेळी न्यु इन्शुरन्स मॅनेजर भिमराज वक्ते बोलतांना असे सांगितले की गेल्या 500 वर्षांपासून अगणित आहुत्या देऊन आपण ज्या दिवसाची प्रतीक्षा करीत होतो तो दिवस आपल्या समोर आहे, 5 ऑगस्ट 2020 रोजी या अभिजित मुहूर्तावर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन होणार असून हा दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा व ज्यांनी बलिदान दिले त्या कारसेवकांच्या प्रयत्नांना यश प्राप्तीचा आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी डायरेक्टर सुभाषराव आव्हाड,संचालक बाळासाहेब वक्ते,माजी सभापती शिवाजी वक्ते, उपसरपंच यशवंतराव आव्हाड,सोपानराव वक्ते, रावसाहेब वक्ते,भाऊसाहेब वक्ते,भानुदास वक्ते,किरण वक्ते, कानिफ वक्ते, भास्कर चव्हाण, प्रा.मधुकरी वक्ते आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here