संगमनेर/प्रतिनिधी :- प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी कीर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्या विरुद्ध संगमनेर न्यायालयात दाखल झालेल्या फिर्यादीवर आज सुनावणी झाली.

इंदोरीकर महाराजांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायालयाच्या त्या हुकूमाविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हीजन अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालयाने खालील कोर्टातील सुनावणीला स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी दि. २० ऑगस्ट २०२० रोजी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे, अशी माहिती इंदोरीकर महाराज यांचे वकील के. डी. धुमाळ यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here