कोपरगाव/प्रतिनिधी(मधुकर वक्ते) :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कुल मधील संत सावता माळी युवक संघाने दत्तक घेतलेल्या मुलांचा गुणगौरव करण्यात आला.इ.5 वी ते 10 वीच्या हुषार व गरजु विद्यार्थ्यांना 12वी पर्यत संपूर्ण शैक्षणिक खर्च करीत त्यांना दत्तक घेतले आहे.असे संत सावता माळी युवक संघ संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद मामा काळे यांनी सांगितले.
सदर उपक्रम हा श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्या प्रेरणेतुन राबविन्यात आला. तसेच सदर उपक्रमास मुत्ताबाई दशरथ काळे यांच्या स्मरणार्थ डॉ.ऊषाताई दोडीया,प्रभाकर सुमंतराव काळे यांच्या स्मरणार्थ निलेश काळे व हेमंत दत्तात्रय ससाणे यांचे सहकार्य लाभले.शत्रुघ्न शाम त्रिभोन जनता इंग्लिश स्कुल संवत्सर इयत्ता दहावी मध्ये 70 % गुण मिळाले त्या बद्दल त्यांचे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने अभिनंदन व सत्कार करन्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सत्कार करताना मुकुंद मामा काळे व प्रगतिशील शेतकरी रत्नाकरकाका काळे, प्रशांतजी ससाणे आदी उपस्थित होते