श्रीरामपुर/प्रतिनिधी :- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा याठिकाणी पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मनुवादी वर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिला आहे

ज्या बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिले सर्वांना समान अधिकार दिले सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खूप काही केले त्या महामानवाची विटंबना करण्यात आली ये खूप दुःखदायक आहे सरकार सांगत आरोपी हा मनोरुग्ण आहे असे सांगितले जाते मग ? मनोरुग्णांना इतर काही दिसत नाही का ? आत्ताच मुंबई येथे राजगूह ची तोडफोड करण्यात आली काय चाललंय या महाराष्ट्रात जर थांबल नाही तर आंबेडकरी जनता शांत बसणार नाही आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तरी सरकारने जनतेचा अंत पाहू नये विटंबना करणाऱ्या मनुवादी आरोपीवर कठोर कारवाई करावी अन्यथा भीमशक्ती संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here